राजकारण

सुषमा अंधारे यांचा भाजपा नेत्यांवर निशाणा

नांदेड उद्योग बाहेर जात असताना राज्य परदेशी गुंतवणुकीत एक क्रमांकावर असल्याच्या थापा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून मारल्या जात असल्याचे म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त देगलूर येथे व्याखानासाठी सुषमा अंधारे आल्या होत्या या दौऱ्यात त्यांनी विविध मुद्यावर पत्रकारांशी संवाध साधला.

यावेळी बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्या की,कोरोना काळात भाजपशासित उत्तर प्रदेशात प्रेते नदीत वाहिली जात असतांनाही महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी राज्य उत्तमप्रकारे चालविले उत्तर प्रदेश सारखी महाराष्ट्रात प्रेते नदीत वाहिली नाहीत.राज्य परदेशी गुंतवणुकीत एक क्रमांकावर असल्याच्या फडणवीसांच्या वक्तव्याचाही अंधारे यांनी समाचार घेतला. फडणवीस अजूनही वास्तवात येत नाहीत. हे भाजपाच्या सर्वच लोकांचे आहे. पंतप्रधान, उपमुख्यमंत्री फडणवीस या सर्वांना ही सवय लागली आहे. उद्योग बाहेर जात असताना कोणत्या गुंतवणुकीच्या बाता हे लोक करीत आहेत.

सध्या शिंदे सरकारकडून माणसांना ओढण्याचे काम सुरु आहे. आमच्याकडे प्रवेश केल्यास तुला एक, दोन कोटींचे कंत्राट देतो असे आमिष दाखविले जात आहे. त्यांना निधीही भरपूर मिळत आहे. परंतु जनमत पैशाने येत नसते. या सरकारबद्दल नकारात्मकता वाढत आहे दरेकरांना फक्त अन् फक्त मुंबईतील प्रॉपर्टी गोळा करण्यापासून वेळ मिळत नाही, त्यांची आमच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याची पात्रता नाही. अशा शब्दात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली
.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत