नांदेड जिल्हा नांदेड शहर

पंकजा मुंडेनी घेतले माहुरच्या रेणुका मातेचे दर्शन

नांदेड-दोन महिन्यांचा राजकीय ब्रेकनंतरभाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत.  शिवशक्ती दर्शन यात्रेमध्ये राज्यातील ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचे दर्शन घेणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर कुलदैवत असलेल्या  श्री क्षेत्र माहुर गडावरील रेणुका मातेचे दर्शन घेतले. या दरम्यान त्या नांदेड विमानतळावरुन माहुरला रस्ते मार्गाने पोहोचल्या. मार्गात त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले.

विधानसभा निवडणुकीनंतर अडगळीत टाकल्याची भावना पंकजा मुंडे यांच्या समर्थकांत  आहे.याबाबतची  त्यांनी अनेकदा नाराजी देखील व्यक्त केली होती. आपण या संदर्भात केंद्रीय नेतृत्त्वाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. तरी देखील भाजपमध्ये कोणतीच हालचाल झाली नाही. गेल्या दोन महिन्यात राज्याचे राजकारण वेगळ्या टप्प्यावर आले आहे.राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारला अजित पवार यांची साथ लाभली. प्रथम शिवसेना आणि आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आमदारांचा एक गट वेगळा होऊन भाजपासोबत सत्तेत बसला आहे. आता पुन्हा शिवशक्ती दौऱ्यातून देवदर्शनासह कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचे नियोजन करत पंकजा पुन्हा मैदानात उतरल्या आहेत.बुधवारी सकाळी  नांदेड विमानतळावर पोहचताच भाजपाचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते ,देविदास राठोड ,व्यंकटेश साठे,मोहनसिंघ तौर सह भाजपच्या स्थानिक नेते व पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

यानंतर पंकजा मुंडे रस्ता मार्गे माहूरकडे निघाल्या मार्गात ठिकठिकाणी  त्यांचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले.बुधवारी प्रथम कुलदैवत असलेल्या  श्री क्षेत्र माहुर गडावरील रेणुका मातेचे दर्शन घेतले.४ सप्टेंबर पासून शिवशक्ती यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगाचे तसेच देवीच्या साडेतीन शक्तीपीठांच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यांच्या समवेत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचीही उपस्थिती होती

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत