किनवट नांदेड जिल्हा

इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस

किनवट – तालुक्यातील इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समितीच्या निवडणुकीत तीन संचालक बिनविरोध 15 संचालक पदाच्या निवडीसाठी 45 उमेदवार रिंगणात किनवट तालुक्यात बहुचर्चित असलेल्या इस्लापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीमध्ये आता चुरस निर्माण झाली . यामध्ये सौ.कमलबाई भुजंग पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रथम महिलांनी बिनविरोध संचालक होण्याचा मान पटकावला. तर भाजपाच्या शकुंतलाबाई बोडेवाड व काशिनाथ रायफलवार ही दोन संचालक बिनविरोध निवडून आली.

आता उर्वरित 45 उमेदवार रिंगणात असून माकपाच्या व काँग्रेसच्या नेते मंडळींनी ही निवडणूक सद्यस्थितीत चुरशीची बनवल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. सदरील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी माजी राज्यमंत्री डी.बी. पाटील विद्यमान आमदार भीमराव केराम, माजी आमदार प्रदीप नाईक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे, कॉम्रेड अर्जुन आडे, उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख मारोती दिवशे यांनी सुरुवातीला मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. पण जागा वाटपामध्ये माकपला स्थान न दिल्याने बिनविरोध होणारी निवडणूक ही चक्क चुरशीची बनली. या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून त्यातच सद्यस्थिती शरद पवार गटात असलेले माजी आमदार प्रदीप नाईक व विद्यमान आमदार भीमराव केराम यांची या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रचाराची बॅनर एकत्र झळकल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

प्रत्येक विधानसभेमध्ये एकमेकांच्या विरोधात राहणारी आजी-माजी आमदार ही एकत्रित या बॅनरवर दिसल्याने अनेक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून काही ठिकाणी नाराजीचा सूर ऐकवास मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच ही प्रचाराची बॅनर मुख्य रस्त्यावर लावलेली अवघ्या दोन तासांमध्ये खाली उतरून टाकल्याने कार्यकर्त्यांमध्ये उलट सुलट चर्चेला उधान निर्माण झाले आहे. व ही बॅनर कुणाच्या आदेशाने खाली उतरण्यात आली हा सुद्धा प्रश्न कार्यकर्त्यांना भेडसावणे साहजिकच आहे ?

त्यातच काँग्रेसने व माकपाने या निवडणुकीत कंबर कसून प्रचाराची सुरुवात केल्याने ही बॅनरबाजी राष्ट्रवादी व भाजपाच्या पत्त्यावर पडते की काय असा प्रश्न आता कार्यकर्त्यातून ऐकावयास मिळत आहे ? बिनविरोध होणारी निवडणुक ही आता लागल्याने उमेदवार मात्र मतदाराच्या कैचीत सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कधी मतदाराकडे न फिरकणारे उमेदवार ही आता थेट शेताच्या बांधावर जाऊन मतदाराच्या भेटीगाठी घेत असताना दिसून येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत