शेती

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी

नांदेड-अतिवृष्टी, किडीचा प्रादुर्भाव झाल्याने गतवर्षी तुरीचे उत्पादन निम्म्याखाली आले. परंतु, बाजारपेठेत तुरीला चांगला भाव मिळाला मंगळवार दि. २९ रोजी येथील कृउबाच्या मोंढ्यात तुरीला १० हजार ३०० रुपयाचा भाव मिळाला आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी तूर उत्पादक शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे.
गेल्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीचा तूर पिकाला फटका बसला. परतीच्या मुसळधार पावसामुळेदेखील तूर पिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. बाजार समितीत तुरीची आवक कमी झाली, तर मागणी वाढली. विदेशातूनदेखील तुरीची आयात कमी झाली आहे. त्यामुळे तुरीचे भाव नवनवीन विक्रम गाठत आहे.

नवीन तूर बाजारात येण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी आहे.शेतकऱ्यांकडे तूर नसल्याने बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक कमी झाली आहे. मागणी वाढल्याने दरवाढ झालेली आहे. याचा लाभ व्यापाऱ्यांना होणार आहे. यंदादेखील तुरीच्या उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात मोसमी पाऊस येण्यास उशीर झाला. अनेक भागाला अतिवृष्टीचा सामना करावा लागला. त्यामुळे तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी तुरीचे दर तेजीतच राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत