- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Thursday, 11 March 2010
त्रैवार्षिक राज्य अधिवेशनाच्या पूर्व तयारी संदर्भात रविवारी बैठक प्रिंट ई-मेल
नांदेड, दि५ (प्रतिनिधी) महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक राज्य अधिवेशनाच्या पूर्व तयारी संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले ही बैठक राज्याध्यक्ष दिलीपराव अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून सदरील बैठक रविवारी सकाळी ११ वाजता होणार आहे.
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीतर्फे त्रैवार्षित पाचवे अधिवेशन नांदेड येथे दि२२ ते २४ फेब्रुवारी दरम्यान श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडीयम मैदानावर घेण्यात येणार आहे यावेळी नांदेडचे भुमिपूत्र मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले आहे यासह शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व समस्यांवर आधारित प्रश्नावर चर्चा करण्याकरीता दि७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता या राज्य अधिवेशनाच्या पूर्व तयारी संदर्भात राज्याध्यक्ष दिलीपराव अंधारे तसेच जिल्हाध्यक्ष दिलीपराव देवकांबळे, विभागीय अध्यक्ष भागवत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे यासह संघटनेचे मुनेश शिरसीकर, उदय देवकांबळे, संघपाल वाटोरे, जीपीजाधव, दत्ता ढवळे, एमएवाडवे, माधव दाभाडे, मोहन लुंगारे, एसदिग्रसकर, मारोती वाघमारे यांच्यासह जिल्हा प्रवक्ते देविदस पाटील यांनी बैठकीस शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले