- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Tuesday, 09 March 2010
तुषार कस्तुरे ‘अबॅकस’ स्पर्धेत राज्यात सर्व प्रथम प्रिंट ई-मेल
नांदेड,दि ५ (प्रतिनिधी) शिवाजीनगर नांदेड येथील केंब्रीज विद्यालयातील ६ व्या वर्गातील विद्यार्थी तुषार उमाशंकर कस्तुरे हा ‘सिप अबॅकस’ अकॅडमीच्यावतीने पुणे येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे
चेन्नई येथील सिप अबॅकस अकॅडमीच्यावतीने दि ३० जानेवारी रोजी पुणे येथे राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेदरम्यान घेण्यात आलेल्या बिगेनर्स लेव्हल या गटात नांदेडच्या सिप ब्रिलियंट किडस अबॅकस अकॅडमीचा विद्यार्थी तुषार उमाशंकर कस्तुरे हा राज्यातून सर्वप्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे त्याच्या या यशाबद्दल नांदेडच्या अकॅडमीचे संचालक रविकिरण देशमुख व संचालिका भाग्यश्री देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला तर तुषारच्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका रेवतीताई गव्हाणे व आई मनिषा कस्तुरे , वडील उमाशंकर कस्तुरे , आजोबा मन्मथ कस्तुरे व शिवराज होनकर, आजी काशीबाई कस्तुरे व मंगलाबाई होनकर, अत्या दैवशाला बिडवे, मामा उप विभागीय अभियंता एसएसबिडवे, नंदा उदगीरे व प्राप्रभाकर उद्‌गीरे आदिंनी अभिनंदन केले आहे