|
मुख्य कार्यकारी अधिकारी हर्डीकर यांनी डीआरडीओ चे वादग्रस्त लेखाधिकारी भुतडा यांना अखेर कार्यमुक्त केले |
|
|
नांदेड, दि ६जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे वादग्रस्त लेखाधिकारी एसजी भुतडा हे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेडमध्ये लेखाधिकारी म्हणून गेल्या २ वर्षापूर्वी रुजू झालेले होते रुजु झाल्यानंतर महिने दोन महिन्यापासून अनेक प्रकारच्या तक्रारी सुरु झाल्या डीआरडीओ मधील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी लेखाधिकारी भुतडा यांच्याकडून कर्मचाऱ्यांचा आर्थिक व मानसिक छळ करीत आहेत एवढेच नव्हे तर डीआरडीए मार्फत राबविणेत येणाऱ्या विविध योजना अंतर्गतच्या विकास कामाचा निधी वितरण करण्यासाठी संचिकेवर अनावश्यक शेरेबाजी करून विलंब लावणे, जनतेला त्रास देणे, पैश्याची मागणी करणे, मागणीची पुर्तता नाही केल्यास तपासून फेर सादर करा अशा प्रकारचा शेरा मारून संचिका पर करणे, आपल्या अधिनिस्त कर्मचाऱ्यास व जनतेस अशा प्रकारे त्रास देत असल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिप नांदेड, विभागीय आयुक्त औरंगाबाद व शासनाकडे कर्मचाऱ्यांनी केली याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे प्रकल्प संचालक बामणे यांनी तक्रारीची दखल घेऊन सविस्तर चौकशी केली व लेखाधिकारी भुतडा यांना आपण आपल्या कार्यशैली मध्ये सुधारणा करावी, कर्मचारी व जनतेशी सौजन्याने वागावे, सर्वांशी सलोख्याचे संबंध निर्माण करावेत अशा प्रकारची नोटीशाद्वारे ताकीद देवून काम करण्याची संधी दिली परंतु सुंब जळाले तरी त्याची पिळ जात नाही या म्हणी प्रमाणे भुतडा यंनी आपल्या कार्यशैली मध्ये काहींच सुधारणा करीत नसल्याची खात्री झाल्यानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत लेखाधिकारी भुतडा यांना डीआरडीए च्या आस्थापनेवरून कार्यमुक्त करून त्यांच्या खात्यास परत करणेचा प्रस्ताव सादर केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिप नांदेड तथा अध्यक्ष जिग्रावियं यांनी दि २ फेब्रुवारी रोजी मान्यता दिली व दि ३ फेब्रुवारी च्या आदेशान्वये भुतडा, या वादग्रस्त लेखाधिकाऱ्यास कार्यमुक्त करण्यात आले वादग्रस्त लेखाधिकारी भुतडा यंनी कर्मचाऱ्यांचा करीत असलेला मानसिक व आर्थिक छळाबाबत त्यांना कार्यमुक्त करावे व त्यांचेवर योग्य ती कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नेते सतीश कावडे, बाबुराव पांचाळ, अभियंता संघटनेचे फड, शिंदे इत्यादींनी सातत्याने सत्याचा पाठपुरावा केला त्याबद्दल जिप कर्मचाऱ्यांच्या मार्फत त्यांचे अभिनंदन होत आहे
|