- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Tuesday, 09 March 2010
जानापूरी येथे भागवत कथेचे आयोजन हभप रामदास महाराज पंढरपूरकर यांची उपस्थिती प्रिंट ई-मेल
नांदेड, दि ६संतश्रेष्ठ जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा जन्म चतुर्थ शताब्दी निमित्त व संत श्री कैकाडी महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्रातील किर्तनकार व कथाकार हभप शिवदास महाराज उर्फ रामदास महाराज पंढरपूरकर यांच्या सुश्राव्य वाणीतून जानापुरी ता लोहा येथे १५ एप्रिल ते २२ एप्रिल दुपारी १ ते ४ या वेळात संत भागवत कथेचे आयोजन केले आहे
या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील अनेक नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, साहित्यिक मंत्रीगण, पत्रकार, उपस्थित राहणार आहेत उद्देश हा की, आजच्या तरूण पिढीला वारकरी सांप्रदाय अधिक समजून त्यांच्या अंगी देशभक्ती, सामाजिक जाणीव, बंधुभाव या गुणांची वाढ व्हावी म्हणून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
या धार्मिक सोहळ्यासाठी सर्व भाविक भक्तांनी सहकार्य करावे व श्रवणाचा लाभ घ्यावा असे नियोजन समितीचे प्रमुख श्री गुरु गयबी नागेंद्र महाराज पानभोसी, प्रा हभप व दत्तात्रय बचाटे, प्रा सुरेश पाटील घोरबांड, श्रीधर धोंडगे गुरुजी, हभप रंगनाथ महाराज ताटे, हभप मधुकर महाराज बारूळकर, हभप रूद्राप्पा महाराज अंबेसांगवीकर, हभप गजानन महाराज, किशन ठिगळे गुरुजी, प्रकाश चितळकर, अरविंद मोरे, पंडीत पवळे गुरुजी, लक्ष्मण बोडके गुरुजी, राम महाराज वडेपुरी, रूद्रावार गुरुजी सिडको, शिवाजी माने नांदेड इत्यादींनी कळविले आहे