- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Thursday, 11 March 2010
माजी सैनिकांनी नौकरीच्या मागे न लागता, मेस्को सोबत उद्योगात उतरावेकर्नल सुहास जतकर प्रिंट ई-मेल
नांदेड, दि ६सैनिकी मुलांचे वसतीगृह, विष्णुपूरी नांदेड येथे आयोजित माजी सैनिकांच्या मेळाव्यास संबोधताना कर्नल सुहास जतकर, संचालक माजी सैनिक कल्याण विभाग यांनी माजी सैनिकांना नौकरीच्या मागे न लागता उद्योगात येण्याचा सल्ला दिला माजी सैनिक महामंडळ बांधकाम क्षेत्रात उरतले आहे व सातारा येथे फर्नीचर व इतर वस्तू उत्पादन करत आहे माजी सैनिकांनी जर उद्योगामध्ये यावयाचे असेल तर त्यांना सर्व प्रकारची मदत महामंडळ करेल सध्या उद्योगात असलेले माजी सैनिक त्यांचे उत्पादन मेस्को मार्फत विक्री किंवा खरेदी करू शकतात माजी सैनिकांच्या संघटनानी पण उद्योगाविषयी जरूर विचार करावा असे संचालकांने सांगीतले मेळाव्यात सध्या शासनाच्या सुरु असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली महिलांच्या बचत गटांनी प्रस्थापित केलेल्या उद्योगांना सैनिक विभागकडून पात्रतेनुसार ५० टक्के अनुदान दिले जात असल्याची माहिती देण्यात आली
मेळाव्यात मुलांच्या वसतीगृहातील वाढलेले शुल्क कमी करावी अशी मागणी माजी सैनिकांनी केल्याने सर्व कॅटेगरीतील मुलांचे शुल्क रू २०० प्रतिमहिना कमी करण्याचे संचालकांनी मंजूर केले
मेळाच्यात जवळपास ४०० माजी सैनिकांची उपस्थिती होती यामध्ये सर्व तालुक्यातील माजी सैनिक होते जिल्ह्यातील युध्द विधवांचा, वीरपत्नी, वीरपीता यांचा सत्कार करण्यात आला व माजी सैनिकांना आर्थिक मदतीचे धनादेशाचे वाटप करण्यात आले