|
राज्य शासनाचे राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर जिल्ह्यातील मेटकर, मठ्ठमवार आदींचा समावेश |
|
|
मुंबई, दि५ राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या राज्य शिक्षक पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली २००९१० या वर्षासाठी राज्यभरातील ९५ शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत प्राथमिक, माध्यमिक व विशेष शिक्षक आणि आदिवासी विभागातील उत्कृष्ट शिक्षकांना दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम आणि समाजाची नि:स्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्या शिक्षकांना या पुरस्कारासाठी पात्र ठरविले जाते पुरस्कार विजेत्या शिक्षकांना ७ हजार ५०० रूपये रोख तसेच पुरस्कार जाहीर झाल्याच्या तारखेपासून दोन अतिरिक्त वेतनवाढी दिल्या जातातया वर्षी एकूण ९५ शिक्षकांची राज्य शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे त्यात ३७ प्राथमिक, ३८ माध्यमिक तर आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या १७ प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे ५ सप्टेंबर २०१० रोजी शिक्षक दिनाच्या विशेष समारंभात शासनाकडून हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील नांदेड जिल्ह्यातील गोविंद तोलाजी मेटकर (प्राथमिक), सायन्ना पिराजी मठ्ठमवार (माध्यमिक), रामा बंडू उईके (आदिवासी विभाग) या शिक्षकांना यावर्षी राज्यस्तरीय पुरस्काराचा सन्मान मिळणार आहे तर हिंगोलीचे मारोती सदोजी बगाटे, रामराव सखाराम शिंदे, परभणीचे श्रीपाद यशवंत देशपांडे यांचाही पुरस्कृत यादीत समावेश आहे
|