|
गुरु गोविंदसिंघ सेवा प्रतिष्ठान प्रतिवर्षी पुरस्कार देणार |
|
|
नांदेड,दि ५ (प्रतिनिधी) येथील गुरुगोविंदसिंघ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आता प्रतिवर्षी विविध क्षेत्रातील व्यक्तींची निवड करुन त्यांचा गौरव करण्याचे ठरविले आहे हा गौरव दोन विभागात होणार असून यावर्षी जीवन गौरव पुरस्कारासाठी चंद्रकांत मस्की(आदर्श राजनीती), उषाताई एकताटे(समाज सेवा),सनतकुमार महाजन (विद्यार्थी कल्याण), लीलाताई कुलकर्णी(सेवाभाव), या मान्यवरांची तर गुणीजन गौरव पुरस्कारासाठी देविदास फुलारी(साहित्यसेवा), शंतनु डोईफोडे (पत्रकारिता),नाथा चितळे (नाटयसेवा), नौनिहालसिंग जहागीरदार (समाज संघटन), आदित्य देशपांडे (क्रीडा), संजय रुईकर(तंंत्र शिक्षण) यांची निवड करणत आलेली आहे निवड समितीने लवकरच या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल असे जाहीर केले असून डॉ अजित गोपछडे,मंजिरी पुरंदरे आणि गोविंद पुराणिक यांचा निवड समितीमध्ये समावेश आहे या पुरस्कारासाठी कोणतेही प्रस्ताव प्रतिष्ठानतर्फे मागवले जात नसून पुरस्कार समितीच पुरस्कार पात्र व्यक्तींची निवड करते
|