|
नवामोंढा परिसरातील एसबीआयच्या एटीएमचे उद्घाटन |
|
|
नांदेड,दि ५ (प्रतिनिधी) भारतीय स्टेट बँक शाखा एपीएमसी नवा मोंढा नांदेड च्या प्रांगणात अद्ययावत एटीएमचे उद्घाटन शामराव पाटील टेकाळे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती , नांदेड यांच्या हस्ते व नंदकिशोर मालु, सहाय्यक प्रबंधक क्षेत्रिय व्यवसाय कार्यालय, नांदेड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी शाखा व्यवस्थापक अनिल परळीकर , रघुनाथ देशपांडे, हेमराजसिंग, गोवर्धन तोडापल्ले, प्रकाश बोईनवाड, अंजली जोशी, मिलिंद गायकवाड, तसेच क्षेत्रिय व्यवसाय कार्यालयातील भोसले माधव चुकेवाड, प्रविण मुखेडकर आणि बँकेचे पेन्शनर्स एमटीदेशपांडे, एसटीकुलकर्णी, कुडकर, चाकोते आणि शाखेतील कर्मचारी वृंद व क्षेत्रिय व्यवसाय कार्यालयातील सर्व कर्मचारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते या एटीएमच्या सुविधेुळे, नवा मोंढा, यशवंत कॉलेज, पॉलिटेकनिक कॉलेज, वसंतनगर, मगनपुरा, मस्तानपुरा, एमएसईबीऑफीस ते आनंदनगर पर्यंंतच्या ग्राहकांची फार दिवसांची मागणी पूर्ण झाली आहे या एटीएमचे वैशिष्ट्य म्हणजे आपण आपला व्यवहार करत असतांना पडद्यावरच्या सुचनेसोबत त्या सुचना आपणांस ऐकावयास मिळतील तरी ग्राहकांनी आमच्या ह्या सुविधेचा लाभ घ्यावा असे शाखा व्यवस्थापक अनिल परळीकर यांनी कळवले आहे
|