|
एकपात्री प्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन |
|
|
नांदेड,दि ५ (प्रतिनिधी) प्रज्ञा प्रतिष्ठान अध्यापक महाविद्यालय आयोजित ज्ञान सरिता कलाअंतर्गत छात्रसेवाकाल शिबीरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष लाल बहाद्दुर शास्त्री विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर होते तर प्रमुख पाहुणे मफुले हायस्कूलचे शिक्षक पावडे होते वऱ्हाड निघालय लंडनला हा एकपात्री प्रयोग पावडे सरांनी सादर केला यास विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला दुपारच्या सत्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले यात विविध देशभक्तीपर गित, नृत्य , नाटके सादर करण्यात आली या कार्यक्रमाचे परीक्षण प्रज्ञा प्रतिष्ठाण अध्यापक महाविद्यालयातील प्राघुमे व प्राजमदाडे यांनी केले सूत्रसंचालन वानखेडे रमेश यांनी केले कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन नारायण अंभोरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गाडेगावकर मॅडम, प्रामनी, मॅडम, प्रावाळके यांनी मार्गदर्शन केले
|