|
झिरो बॅलन्सवर मुलींचे खाते उघडण्यास बँकेचा नकार |
|
|
हिंगोली,दि५(प्रतिनिधी) माध्यमीक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतून ३ हजार रुपये भत्ता देण्याचे शासनाने जाहीर केले सोळा वर्ष वय पुर्ण न झालेल्या मुलींचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते उघडण्याबाबत अद्यापही बँक तयार नसल्याने हिंगोली जिल्ह्यातील शंभराच्या वर मुलींनी जिल्ह्यातील प्रशानाला लेखी निवेदन देवून निर्माण आडचणी प्रशासनासमोर मांडल्या जिल्ह्यातील मसोड येथील मायावती पंडित, अरुणा मोगले, पौर्णिमा मोगले, यहळेगाव येथील उषा बगाटे, मायावती भगत, गोरेगाव येथील सविता सुतार, भाग्यश्री आळणे, शुभांगी मोरे, पिंपळदरी येथील वनिता कोंडबा खोकले, सोनूताई मोरे, आदी शंभराच्यावर मुली व काहींंचे पालक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झिरो बॅलन्सवर मुलीचे खाते खोलण्यास तयार नसल्याची कैफीयत मांडण्यासाठी आले हाेेते माध्यमीक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतून ३ हजार रुपये भत्ता देण्याचे शासनाने जाहीर केले योजनेची अमंलबजावणी जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षणाधिकारी यांचेकडून करुन घेवून संचालणालयास कळविले होते तसेच सदरील योजनेसाठी अनुसूचित जाती जमातीतील वय वर्ष सोळा पूर्ण न झालेल्या मुलींचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडण्याबाबत अडचण निर्माण झाल्यानुसार वित्त मंत्रालय भारत सरकारचे दिल्लीचे संचालक यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये या योजनेसाठी झिरो बॅलन्सवर मुलीचे खाते उघडण्याबाबतचे पत्र कार्यवाहीसाठी जोडले होते व शिक्षण अधिकाऱ्यांना बँकेचे व्यवस्थापक यांना विनंती करुन खाते, उघडण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सुचना दि२७ ऑक्टोबर ०९ ला विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देण्यात आल्या असतांना अद्यांपपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडिया झिरो बॅलन्सवर मुलीचे खाते उघडण्यास तयार नसल्याने जिल्ह्यातील शाळेच्या मुलींनी जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदने देवून खाते उघडण्यासाठीच्या अडचणी मांडल्या जिल्हाधिकारी शैला रॉय बाहेरगावी दौऱ्यावर असल्याने या मुलींच्या शिष्टमंडळांची त्यांच्याशी भेट न झाल्याने त्या मुली बराच वेळ जिल्हाधिकारी कार्यालयात थांबल्या होत्या शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी आल्यानंतर त्यांनी मुलींची कैफीयत ऐकूण घेतली
|