|
उर्दूच्या अंगणवाड्यांना लवकरच मान्यता देवू आदांडेगावकर |
|
|
वसमत,दि५(प्रतिनिधी) समाजात शिक्षणाविषयी रुची निर्माण व्हावी समाज बांधवांना आपल्या भाषेत सहज शिक्षण घेता यावे यासाठी शैक्षणिक प्रगतीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आगामी काळात जिल्हा व तालुक्यात उर्दू माध्यमांच्या आंगनवाड्यात उर्दू माध्यमांच्या आंगणवाड्या लवकरच मान्यता देणार असल्याची घोषणा आजयप्रकाश दांडेगावकर यांनी केली डॉबाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाचे औचित्य साधुन येथील सम्राट कॉलनी येथे आदांडेगावकर, जिपअध्यक्ष बालासाहेब अटकोरे, राकाँ जिल्हाध्यक्ष मुनिर पटेल, अल्पसंख्यांक काँग्रेस आयचे जिल्हाध्यक्ष शेख हबीब, खलिल अहेमद, प्रल्हाद राखोंडे, गोरख पाटील, राजकुमार एंगडे, गौतम मोगले संयोज शेख अफसर, अकबर दादामियां, दातार आदींची व्यासपिठावर उपस्थिती होती जिपअध्यक्ष यांनी उर्दू आंगणवाड्यांना मान्यता देण्याचा प्रस्ताव मांडला असता त्यात उत्तर देतांना आदांडेगावकरांनी लवकरच उर्दू आंगनवाड्यांना मान्यता देण्याची घोषणा जाहीर सभेत करतांच टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी आदांडेगावकरांचे आभार मानले अध्यक्षीय समारोपात पंडितराव देशमुख यांनी नामविस्तार दिनाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन राकाँचे पदाधिकारी शेख अफसर यांनी केले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख जावेद, पांडूरंग कोल्हे, शेख युसूफ, शेख फरोज गफुर, शेख अफजल, केरबा दातार आदींनी परिश्रम घेतले
|