|
राहूल गांधी जिंकले, शिवसेना हरली |
|
|
|
मुंबई, दि५ काँग्रेसचे युवा नेते खाराहूल गांधी यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात लोकलमधून प्रवास करीत जनसामान्यांशी संवाद साधला आणि शिवसेनेच्या काळे झेंडे दाखविण्याच्या आंदोलनाचा पार फज्जा उडाला शिवाजी महाराजांनी मोगलांच्या सैन्याला कात्रज घाटात जशी हूल दिली तशी राहूल गांधींनी शिवसैनिकांना मुंबईत दिली शिवसेनेने आंदोलनाचा केलेला गाजावाजा आणि राहूल गांधींना जनसामान्यांनी मुंबई दौऱ्यात दिलेला प्रचंड प्रतिसाद यामुळे राहूल गांधींच्या दौऱ्याबाबत सामान्य माणसांनी ‘राहूल गांधी जिंकले, शिवसेना हरली’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली राहूल गांधींचा मुंबई दौरा यापूर्वीच जाहीर झाला होता तथापि त्यांच्या विधानाचा विपर्यास करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राहूल गांधींना त्यांच्या मुंबई दौऱ्यात काळे झेंडे दाखवावे असा शिवसैनिकांना आदेश दिला राहूल गांधी यांनी त्यास न जुमानता आपला मुंबई दौरा ठरल्याप्रमाणे होईल असे जाहीर केले मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी राहूल गांधींचा अपमान सहन करणार नाही अशी घोषणा करून कायदा हातात घेणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे जाहीर केले शिवसेनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वच ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता विर्लेपार्ले येथील भाईदास हॉलमध्ये काँग्रेसच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ आणि घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरातील डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन असे राहूल गांधींचे कार्यक्रम होते या दोन्ही ठिकाणांना जाणाऱ्या रस्त्यावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता राहूल गांधी यांचे विमानाने मुंबईत आगमन झाले त्यांच्या सोबत अभायुवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव हे ही होते विमानतळावरून राहूल गांधी हेलिकॉप्टरने पवन हाऊस मध्ये आले तेथून ते विलेपार्लेच्या भाईदास हॉलमध्ये आले भाईदास हॉलमध्ये राहूल गांधींनी युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले युवकांनी राजकारणात सक्रीय भाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना आणि विविध संस्कृतींना एकत्र आणणारा फक्त काँग्रेस हाच एकमेव पक्ष आहे असेही राहूल गांधींनी सांगितले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना राहूल गांधी म्हणाले की, देशात दोन प्रकारचे नेते असतात एक देश जोडणारे आणि दुसरे देशाला तोडणारे राहूल गांधी अंधेरीहून हेलिकॉप्टरने घाटकोपरला येणार होते परंतु अचानक त्यांनी आपला बेत बदलला आणि त्यांच्या समवेत असलेला गाड्यांचा ताफा रेल्वे स्टेशनवर आला तिथे अंधेरीहून दादरपर्यंत राहूल गांधींनी लोकलमधून प्रवास केला राहूल गांधींना पाहून लोकांना आनंदाचा धक्का बसला राहूल गांधींनी लोकलमध्ये प्रवाशांशी हितगुज केली बऱ्याच जणांनी विकासाविषयी राहूल गांधींना विनंती केली दादरला आल्यानंतर राहूल गांधी पुन्हा मध्य रेल्वेच्या तिकीट खिडकीपाशी आले आणि त्यांनी रांगेत उभे राहून तिकीट काढले ते ही सेकंड क्लासचे दादरहून घाटकोपरपर्यंत राहूल गांधींचा लोकल प्रवास सुरू झाला राहूल गांधींना पाहून युवकांनी डब्यात एकच गर्दी केली राहूल गांधी झिंदाबाद, देश का नेता कैसा हो, राहूल गांधी जैसा हो अशा घोषणांनी लोकलचा डबा दुमदुमला राहूल गांधींना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न करणारे शिवसैनिक मात्र हिरमुसले झाले कारण राहूल गांधींनी त्यांना लीलया हूल दिली होती
|