|
आता एसटीसुद्धा झाली ऑनलाईन |
|
|
नांदेड, दि५ (प्रतिनिधी) ऑनलाईन हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे ऑनलाईन अॅडमिशन, ऑनलाईन परीक्षा, ऑनलाईन बँकींग, ऑनलाईन ट्रेडींग, विमान व रेल्वे प्रवासाचे आरक्षण ऑनलाईन या सर्वात आपली एसटीका बरं मागे राहील? आता एसटीचे तिकीटही ऑनलाईन म्हणजे इंटरनेटद्वारे मिळण्याची सुविधा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे दि८ जानेवारी रोजी या सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला संगणकीकरणाचा व्यापक कार्यक्रम मंडळाने हाती घेतला असून २४७ आगारांच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशिनचा वापर आणि ३२७ बस स्थानकांवर संगणकीय आरक्षण सुविधा पुरविण्याचा यात समावेश आहे हा प्रकल्प बीओटी तत्वावर करण्यात येत असून त्यासाठी मेट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड सर्व्हीसेस लिमुंबई यांची निवड महामंडळाने केली आहे संणकीय आरक्षण सुविधा प्रथम टप्प्यात २७ बसस्थानकांच्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे याशिवाय ११३ अधिकृत खाजगी बुकींग एजंटद्वारे ही सुविधा मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, पंढरपूर, औरंगाबाद या शहरात विस्तारीत करण्यात आली आहे उर्वरित ३०० बसस्थानकांमध्ये संगणकीय आरक्षण येत्या १० महिन्यात टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यात येणार आहे प्रवाशांना इंटरनेटद्वारे तिकीट आरक्षण सुविधेसाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून एचडीएफसी बँक व इंडीया आडीयाजकॉम लिकंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सध्या २३८३ सेवांसाठी संगणकीय आरक्षण सुविधा उपलब्ध असून यात ८५० लांब पल्ला, १२८३ मध्यम लांब पल्ला व २५० किमीअंतराच्या सेवांचा समावेश आहे २५३ वातानुकूलित, १००० निमआराम, ११३० सर्वसाधारण सेवा प्रकारातील फेऱ्यांसाठी ही आरक्षण सेवा उपलब्ध आहे या योजनेत दादरपुणेदादर, पुणेनाशिकपुणे, औरंगाबादपुणेऔरंगाबाद, बोरीवलीस्वारगेटबोरीवली, औरंगाबादमुंबईऔरंगाबाद, पुणेठाणेपुणे वातानुकुलित शिवनेरील फेऱ्यांचा समावेश आहे पायलट प्रकल्पांतर्गत सध्या मुंबई, ठाणे, पुणे, अमरावती, नागपूर, नाशिक व पंढरपूर या ठिकाणच्या २७ बसस्थानकांवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे
|