|
८ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय पत्रकारिता कार्यशाळा |
|
|
नांदेड, दि५ (प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलाच्या वतीने दि८ व ९ फेब्रुवारी रोजी विद्यापीठात पत्रकारिता काल व आज या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री नाफौजिया खान यांच्या हस्ते होणार आहे पत्रकारिता या विषयात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून दि८ फेब्रुवारी रोजी उद्घाटन समारोहाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉएसबीनिमसे हे राहणार आहेत कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आडीपीसावंत, सामाजिक विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉयुडीसावंत हे उपस्थित राहणार आहेत दि८ रोजी पहिल्या सत्रात महाराष्ट्र वृत्त सेवा मुंबईचे मुख्य संपादक कुमार कदम यांचे तर दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ संपादक टाईम्स वृत्तपत्र समुहाचे संपादकीय सल्लागार खाभारतकुमार राऊत यांचे व्याख्यान होणार आहे दि९ रोजी सकाळी १० वाजता राजस्थान विद्यापीठातील माध्यमशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉसंजीव भानावत यांचे तर दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक एसकेकुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे त्यानंतर हासेणाऱ्या समारोप समारंभास प्रमुख अतिथी म्हणून आओमप्रकाश पोकर्णा हे उपस्थित राहणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉसर्जेराव निमसे हे असतील वरील कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉदीपक शिंदे, डॉकेशव देशमुख, डॉव्हीएनपाटील, डॉसुहास पाठक, प्राराजेंद्र गोणारकर, प्रासचिन नरंगले, प्राअशोक गिनगिने, प्राडॉपृथ्वीराज तौर, प्रामहेश जोशी आदी प्रयत्न करत आहेत
|