- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Thursday, 11 March 2010
असंघटित कामगारांच्या हितास प्राधान्य-मुख्यमंत्री प्रिंट ई-मेल

मुंबई ,दि ५ कामगारांचे प्रश्न सोडवितांना असंघटित व असंरक्षित क्षेत्रातील कामगारांच्या हितास प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात आयोजित कामगार मेळाव्यात बोलतांना दिली

अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वाशी येथील फळ व भाजीपाला मार्केटमधील इमारतीतील स्वर्गीय शंकरराव चव्हाण सभागृहाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले सहकार व पणनमंत्री हर्षवर्धन पाटील, राज्याचे कामगार राज्यमंत्री पद्माकर वळवी, आप्रशांत ठाकूर, विवेक पंडीत, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार विजय सावंत, उदयसिंह देशमुख उर्फ भय्यूजी महाराज आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते
कामगारांना ३ हजाराच्यावर पगार असेल तर धनादेशाने देण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला असून तो कामगार क्षेत्रास बंधनकारक आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, बोनसची रक्कमही धनादेशाने देण्यात येणार आहे कामगारांच्या घरांच्या प्रश्नांना शासनाने प्राधान्य दिले असून घरकूलाचाही प्रश्न लवकरच सुटेल तसेच प्रत्येक कामगारास स्मार्ट कार्ड देण्यात येईल शेतमजूर व ऊसतोड कामगारांना वृद्धापकळात सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा विचार शासन करीत आहे
राज्यात ४५ कोटी संघटित तर ४ कोटी असंघटभत कामगार आहेत या कामगारांची पिळवणूक होऊ नये म्हणून त्यांना संरक्षण तसेच त्यांच्या कष्टाला प्रतिष्ठा देण्यास शासन प्राधान्य देईल नवी मुंबई परिसरात शहरीकरण, नागरीकरण, औद्योगिकरणामुळे लोकसंख्येत वाढ होत आहे प्रत्येक नागरिकांस सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा विचार शासन करीत आहे
या राज्यात साडेचार कोटी संघटीत तर चार कोठी असंघटीत कामगार आहेत या कामगारांची पिळवणूक होऊ नये, त्यांना संरक्षण तसेच त्यांच्या कष्टाला प्रतिष्ठा देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे प्रत्येक नागरीकाला सुरक्षित जीवनाची हमी मिळावी यासाठी गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढली जातील असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला यावेळी बोलतांना सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, सहकार व पणन विभागाचे राज्यात उत्कृष्ट काम आहे २९५ कृषी उत्पन्न बाजार समित्यातून मागील वर्षात ४२ हजार कोटी रूपयांच्या शेतमालाची उलाढाल झाली यावर्षी ही उलाढाल १ लाख कोटी पर्यंत वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्र हे कृषी व औद्योगिक क्रांतीचे प्रथम क्रमांकाचे राज्य व्हावे यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे
कामगार राज्यमंत्री वळवी यांनी कामगारांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली असंघटीत कामगारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे असे ते म्हणाले प्रारंभी कामगारनेते बाबुराव रामिष्टे यांनी अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या कामाची माहिती देऊन कामगारांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली