वृक्षारोपण, संगोपन कसे करावे?भारतातील वृक्षसंपदा नष्ट होवू लागल्याने पावसाचे प्रमाणही कमी होत चालले आहे विशेष म्हणजे हे समजून घ्यायला आम्हाला बरीच वर्षे लागली पूर्वी अस्तित्वात असलेली वृक्षदाटी गृहनिर्माण व सरपणासाठी वापरण्यात येवू लागल्यामुळे हिरवेगार दिसणारे डोंगर उघडे, बोडके दिसू लागले परिणामी पावसाचे प्रमाण कमी झाले व देशात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली दूरवर ओढले जाणारे पावसाची दगड झाडी अभावी अडविले न गेल्यामुळे भारतासारख्या विशाल देशात वारंवार अवर्षणे पडू लागली पूर्वी लोकवस्ती खेड्यात असल्यामुळे व जवळच डोंगर, लहान मोठी जंगले असल्यामुळे जळाऊ लाकडांची उणीव भासत नसे पण कालांतराने ग्रामवस्ती कमी होवून नागरी वस्ती वाढू लागली तसेच वृक्षच्छेदनाचा वेगही वाढला नदी, नाल्यांमध्ये बांध घालूनही नगरातील लोकवस्तीला पाण्याचा तुटवडा भासू लागला तेव्हा कुठे कारण परंपरेचा शोध सुरू झाला वृक्षारोपण, वनमहोत्सव, वनीकरण, पर्यावरण, प्रदूषण वगैरे शब्द वृत्तपत्रात प्रसिद्ध होवू लागले भाषणांनी कान बधिर झाले वनमहोत्सव साजरे होवू लागले त्याचा प्रत्यक्षात किती फायदा होतोय हे येणारा काळच सांगेल पुराणातही वृक्षारोपणाला महत्व पुराणकाळात मोठ्या प्रमाणात वृक्षसंगोपन केले जायचे वृक्ष, विज्ञान, वनस्पती शास्त्र, वृक्षरोपण इतकेच काम वृक्षसिंचन म्हणजे झाडांना पाणी कसे द्यावे, कोणत्या ऋतुत, कोणत्या वेळी पाणी शिंपावे तसेच खते कोणती घालावीत याची माहिती, कोणती झाडे लावावीत याचाही उल्लेख सापडतो एखाद्या ज्ञानकोशासारखी माहिती असणाऱ्या अग्निपुराणात वृक्षारोपणाबद्दल बरीच माहिती आढळते उत्तर भारत व दक्षिण भारतातील हवामानात बरीच तफावत असल्यामुळे वृक्षाराेेपणाच्या काळात थोडाफार फरक होणे साहजिकच आहे वृक्षारोपण हे शास्त्र मानून अग्निपुराणात त्याला वृक्षायुर्वेद असे संबोधले जाते वृक्षारोपणासाठीची जागा म्हणजे उद्यान किंवा तिच्या मध्यभागी पुष्करिणी (तलाव किंवा मोठी विहीर) तयार करावी त्यात नदीचे किंवा नाल्याचे पाणी येईल अशी व्यवसथा करावी कडूनिंग, श्वत, ताम्रअशोक, केळी, जांभूळ, बकुळ, नारळ हे वृक्ष लावावेत घराच्या आसपास वृक्षारोपण बनविणे, घराच्या उत्तरेस प्लक्षा (पाकड), पूर्व दिशेला वटवृक्ष, दक्षिण दिशेला गुल व पश्चिमेला पिंपळाचे झाड लावावे सोयीप्रमाणे आम्रवृक्ष लावावेत हे रोपण शहरात किंवा खेड्यात असल्यामुळे घनदाट अरण्यात आपोआप उगवणाऱ्या व वाढणाऱ्या वृक्षांचे मात्र वर्णन नाही तसेच उद्यानात रोवलेल्या झाडांना पाणी कसे द्यावे याचीही माहिती दिली आहे वृक्षारोपण ग्रीष्म ऋुतूत म्हणजे ज्येष्ठ आषाढ या महिन्यात करावे व झाडांना पाणी द्यावे भारतात काही प्रदेशात वर्षा ऋतूत म्हणजेच सप्टेबर महिन्यात पाऊस पडत नाही त्यामुळे वृक्षसिंचन करावे थंडीच्या दिवसात झाडांना पाणी द्यावे जमीन कोरडी झाल्यावर दिवसातून दोन वेळा, निदान एकदा तरी झाडे पाण्याने शिंपावीत दोन झाडांमध्ये आंबे, फणस आदी झाडे लावून त्यामध्ये तीस हातांचे अंतर ठेवावे नारळ व खजूर मिठाच्या पाण्याने फलवृद्धी होते औषध, खतनिर्मितीसाठी उपयोग प्राचीन व आधुनिक वैद्यकशास्त्राच्या संशोधनानुसार झाडे ही निसर्गाचा समतोल राखण्याचे काम करतात निसर्गातील दूषित हवा शोषण शुद्ध हवा बाहेर फेकण्याची प्रक्रिया ती स्वाभाविकपणे करीत असतात वृक्षांच्या गळून पडणाऱ्या पाल्यापाचोळ्यापासून उत्कृष्ट खतनिर्मिती करता येते
|