- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Tuesday, 09 March 2010
जिल्हास्तरीय अॅथलेटीक पंच परीक्षेस प्रतिसाद प्रिंट ई-मेल
नांदेड,दि. २९ (प्रतिनिधी)नांदेड जिल्हा हौशी अॅथलेटीक संघटना नांदेड यांच्या वतीने व महाराष्ट्र हौशी अॅथलेटीक संघटना पुणे यांच्या मान्यतेने नांदेड येथे नुकतीच जिल्हा स्तरीय पंच परीक्षा राणी लक्ष्मीबाई हायस्कूल यशवंतनगर, नांदेड येथे संपन्न झाली सदरील पंच परीक्षेस जिल्हयातून सुमारे ५० शिक्षक, प्राध्यापक खेळाडू, क्रिडाप्रेमी उपस्थित होते.
पंच परीक्षेपूर्वी नांदेड जिल्हयाचे सचिव प्रलोभ कुलकर्णी यांनी या सर्वांसाठी एक तासाची कार्यशाळा घेवून मार्गदर्शन केले यावेळी बोलताना त्यांनी राज्यस्तरीय अॅथलेटीक पंच परीक्षा नांदेड येथे घेण्या संदर्भात राज्य संघटनेला विनंती करणार आहोत असे सांगितले तसेच संघटनेच्या कार्यावर प्रकाश टाकला.
सदरील पंच परीक्षा यशस्वी करण्यासाठी गोपाळ पेंडकर, विष्णु पुर्णे, गजानन जोशी, शेख चाँद, हरी पांचाळ, अमृता सोनकांबळे, मुख्याध्यापक शिवकुमार टाले आदींनी परिश्रम घेतले.